‘क्लिनिक्स ऑन क्लाउड’ ची प्रभावी आरोग्यसेवा आणि आरोग्य एटीएम संकल्पना

पुणे: तळेगाव येथील नागरिक कार्यक्षम आणि प्रभावी आरोग्य सेवेपासून वंचित राहत आहेत. या उद्देशाने पुण्यातील अभय आणि मनश्री अग्रवाल या दांपत्याने ‘क्लिनिक्स ऑन क्लाऊड’ या आरोग्य एटीएम संकल्पनेच्या माध्यमातून पुढाकार घेतला आहे.

या आरोग्य एटीएमद्वारे केवळ १५ मिनिटांत ६५ हून अधिक आरोग्य चाचण्या करणे शक्य आहे. तसेच त्याचे रिपोर्ट्स देखील लागलीच उपलब्ध होतात. या आरोग्य एटीएमद्वारे ग्रामीण भागातील टेलीमेडिसिनचे प्रभावीपणे वापरणे शक्य होणार आहे.

आरोग्य एटीएम या संकल्पनेचे जनक आणि ‘क्लिनिक्स ऑन क्लाऊड’चे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी अभय अग्रवाल यांनी माहिती दिली. ‘क्लिनिक्स ऑन क्लाऊड’च्या सहसंस्थापिका आणि व्यवस्थापकीय संचालिका मनश्री अग्रवाल, या आरोग्य एटीएमच्या वितरण व्यवस्थेचे महाराष्ट्रातील काम पाहणाऱ्या डायना ब्लेस’क्लाउडवरील क्लिनिक्स’ ची प्रभावी आरोग्य सेवा आरोग्य एटीएम संकल्पना कंपनीचे अजय दुमणे हे देखील यावेळी उपस्थित होते.

याविषयी बोलताना ते म्हणाले की, हे आरोग्य एटीएम वीज आणि इंटरनेट यांच्याशिवाय कार्यरत राहत असून यामध्ये ११ प्राथमिक चाचण्यांसह हृदय रोग, मधुमेह, रक्तदाब, हिमोग्लोबिन, एचबीएवनसी, मानसिक आरोग्य, फुफ्फुसाशी संबंधित विकार, डोळ्यांची तपासणी, कान, दात, त्वचा, किडनी यांच्याशी संबंधित चाचण्या होऊ शकणार आहेत. याबरोबरच डेंग्यू, मलेरिया, कोविड, एचआयव्ही, टायफॉईड, चिकनगुनिया यांसाठीच्या विकारांच्या रॅपिड चाचण्या करणे देखील शक्य आहे, असे मनश्री अग्रवाल यांनी नमूद केले.

Scroll to Top